Du er ikke logget ind
Beskrivelse
झुलता पूल' ही या संग्रहातील एक महत्त्वाची एकांकिका. या एकांकिकेबद्दल सुप्रसिद्ध नाटककार आणि नाट्यसमीक्षक राजीव नाईक यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ते म्हणतात, ""पुष्कळशा मिथक कथा कुठल्या तरी वस्तुस्थितीचं स्पष्टीकरण करू पाहातात. तशी सत्यनारायण पूजेच्या संदर्भातली नवकल्पित कथा इथे येते. एक नदी ह्या शहराचं दोन भागांत विभाजन करते हे भौगोलिक सत्य एक सामाजिक-मानसिक विभाजनदेखील कसं ठरतं, हे ठसवणारी कथा. दैविक-स्तुतीची टर उडवत, उलटकरण साधू इच्छित कथा सांगितली जाते.. ... या एकांकिकेत दोन अवकाश आहेत. हे दोन अवकाश भौगोलिक आहेत तसे आर्थिक मिती असलेलेही आहेत. आर्थिकतेमुळे सामाजिकता ठरली आहे. दोन्ही अवकाश उच्चवर्णीयच असावेत. ह्या आर्थिकतेने ठरलेल्या सामाजिकतेमुळे मानसिकदृष्ट्याही हे अवकाश निराळे होतात. इथे जन्म-जातीचा संबंध नाही. विशिष्ट संस्कृतींना जन्म देणारी आर्थिकता ठसते; पण ही आर्थिक मिती शिक्षणामुळे, पेशामुळे आहे, भौतिक ध्येयं आणि मूल्यं ह्यातल्या बदलांमुळे आहे. हे विभाजन ठळक आहे, ढोबळही आहे. हे दोन्ही अवकाश मध्यमवर्गीयच आहेत; एक जरा वरचा आणि एक जरा खालचा. ...ह्यातल्या दोन अवकाशांत फरक आहे, पण त्या