Du er ikke logget ind
Beskrivelse
ही कथा ऊर्मिलेची आहे. रामायणात तिच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालं आहे. जशी सीता रामाबरोबर वनवासात गेली, तशी ऊर्मिलादेखील लक्ष्मणाच्या पावलावर पाऊल टाकत वनवास पत्करू शकली असती; परंतु तिने तसं केलं नाही. पतीच्या विरहामुळे उद्भवलेल्या आपत्तीचा सामना करताना तिने दाखवलेला खंबीरपणा कौतुकास्पद होता. लक्ष्मणाची वाट पाहत चौदा वर्षांचा प्रदीर्घ काळ एकटीने राजप्रासादात घालवण्याचा निर्णय ऊर्मिलेने का घेतला? ऊर्मिलेने सांगितलेली ही जीवनकथा तुम्हाला नक्कीच मोहित करेल.