Du er ikke logget ind
Beskrivelse
आजी, आजोबा आणि नातवंडं...एक विलोभनीय नातं...नात्याचे पदर तरी किती हळूवार मर्मबंधात जपून ठेवण्यासारखे आजच्या विज्ञान युगात मात्र नात्यांचे संदर्भ बदलताना दिसत आहेत. विज्ञानामुळे सामाजिक आणि भावनिक दृष्टया बदलत असलेल्या वास्तवात आजी- आजोबा आणि नातवंडं या नात्याचे काय होणार? विज्ञान-तंत्रज्ञान आपलं आयुष्य पार उलटपालट करुन टाकत असताना या नात्यांचे गोफ कसे राहणार? प्रश्न तसा नाजुकच आहे. कारण मुद्दा संस्कृतीचा, संस्कारांचा आणि पूर्वसंचिताचा आहे.