Du er ikke logget ind
Beskrivelse
श्याम मनोहर या मनुष्याने मराठी गद्याला हाताशी धरून कादंबरीत जी काही उलथापालथ केली आहे ती उलगता उलगता कित्येक पाने खर्ची पडावी अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे, 'हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव' या पुस्तकावर बोलणं इतकं सोपं नाही. विक्षिप्त रॅशनॅलिटीच्या भाषेत बोलणाऱ्या या लेखकात प्रसंग, पात्रे, वर्णने आणि निवेदने हे त्या भाषेचे नाम, सर्वनाम, क्रियापद आदीं समतुल्य भाषाघटक असतात. त्यामुळे त्यांच्या कादंबरीतली पात्रे एकाच उफराट्या मराठीत, कधी ग्रांथिक तर कधी बोलचालीच्या तालुकाप्लेसच्या मराठीत, पण विक्षिप्त रॅशनॅलिझमच्या भाषेत बोलतात. त्यांचं प्रत्येक पात्र हे एकच, एकाचीच भाषा बोलतं. एकाच युजरने वेगवेगळ्या नावाने लॉगीन करावं किंवा एकाच माणसाने आपली वेगवेगळी प्रोफाईल्स बनवून एकमेकांशी चॅटावं तशी त्यांची सगळी वेगवेगळी पात्रं फक्त देहरूपाने अस्तित्वात असतात. त्यांना लेखकाच्या मंत्रशक्तीने तेवढ्यास तेवढं बोलायची वाचा मिळते आणि हा अनेकपात्री प्रयोग नैसर्गिकपणे तळाशी एकपात्री आणि तळाखालून एकजोड होऊन जातो. इतर ठिकाणाप्रमाणे याही कादंबरीत तुलनेने संथ असलेला, फारसा हालता नसलेला, भाषेच्या परिणाम