Du er ikke logget ind
Beskrivelse
डॉ. सुनिलदत्त चौधरी यांचे विलक्षण वैशिष्ट्य त्यांच्या अन्तप्रेरणेला आहे. अशी शक्ती आत्मबोध झालेल्या महंताचीच जागृत होते असे मानले जाते. डॉ. चौधरींना असा आत्मबोध झालेला आहे. भारतीय परंपरेत त्याग या संकल्पनेचे महत्वाचे स्थान आहेच. आपण सुखापेक्षा समाधानाला अधिक महत्व देतो. मिळवण्यापेक्षा दानाने अधिक समाधानी होतो. भौतिक मालमत्तेपेक्षा ज्ञानाला जास्त किंमत देतो. अशा ज्ञानसंपन्नतेतून, दानातून त्यागातून परिपूर्णतेकडे जाणार्]या डॉ. सुनिलदत्त चौधरी यांची अद्भुत, विलक्षण कहाणी लेखिकेने अत्यंत ओघवत्या भाषाशैलीत चित्रीत केली आहे.