Du er ikke logget ind
Beskrivelse
आपल्याला स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे नियमांची, मानांकनांची आणि मूल्यांची गरज असते. आपल्याला दिनक्रमाची आणि परंपरेची गरज असते. ही सुव्यवस्था, शिस्तबद्धता आहे. अव्यवस्था आपल्याला पूर्णपणे गिळंकृत करते आणि ही गोष्टही चांगली नसते. आपण सरळ आणि साध्या मार्गावरून वाटचाल करत राहण्याची गरज असते. या पुस्तकातील बारा नियमांपैकी प्रत्येक नियम आणि त्यांच्याशी संबंधित निबंध या मार्गावरच राहण्याविषयी मार्गदर्शन करतात. सुव्यवस्था आणि अव्यवस्था यांना विभागणारी रेषा म्हणजे हा मार्ग होय. तिथेच आपण पुरेशा प्रमाणात स्थिर असतो, पुरेशा प्रमाणात शोध घेत राहतो, पुरेशा प्रमाणात परिवर्तन घडवून आणतो आणि पुरेशा प्रमाणात सहकार्यही करतो. तिथेच त्या मार्गावरच आपल्याला आयुष्याचं आणि त्याच्या अटळ दुःखांचं समर्थन करणारा अर्थ सापडतो. आपण योग्य प्रकारे जगलो तर कदाचित आपल्या स्वतःच्या आत्मचैतन्याचं, आत्मभानाचं ओझं पेलण्यास आपण समर्थ बनू शकू.